Total Pageviews

Saturday, August 11, 2012

सौ.मानसी श्रेयस बडवे



(एम.ए.संगीत)


जन्मदिनांक- २९.४..१९८६
कलाक्षेत्र- कीर्तन
गुरु- कीर्तनरंग मिलिंद बडवे व राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे.

विषेश पुरस्कार- मल्लीकार्जुन येथे कीर्तनचंद्रिका पदवी प्राप्त,. पुणे मनपाचा बालगंधर्व पुरस्कार- २००५. चैतन्य ट्रस्टतर्फे पर्वती भूषण पुरस्कार.

विशेष माहिती- आजवर महाराष्ट्र व महाराष्टाबाहेर ११०० कीर्तने. आकाशवाणी, दुरदर्शनवर अनेक कार्यक्रम. युवा कीर्तनकारांची `कीर्तन जुगलबंदी` या अभिनव कीर्तनाततील प्रमुख कलावंत.

या दोन युवक कलाकारांचा पहिला जुगलबंदीचा कार्यक्रम १ जून २००५ ला पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात गाजला. पुरुष कीर्तनकार विरुद्ध स्त्री कीर्तनकार, आपापला अभिनिवेश कायम ठेवून एक पौराणिक कथा तर दुसरी ऐतिहासिक कथा अतिशय तळमळीने सादर करतात. तमाशातील कलगी-तुऱ्या प्रमाणे हा एक संगीतमय परिसंवाद होतो. त्याला जुगलबंदीचे स्वरूप येते. यात कलावंतांबरोबर श्रोत्यांचीही कसोटी लागते. पुणेरी पगडी धोतर नेसून श्रेयस तर नऊवारी साडी नेसून नाकात नथ घालून मानसी श्रोत्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न करतात.



समर्थ रामदासाचे पद राम गावा, राम घ्यावा हे पद पूर्वार्धा करता घेऊन म्हटले की बोहल्यावरून पळालेल्या रामदासाचे नाशिकची पंचवटी गाठली आणि अनेक वर्ष जपतप करून साक्षात रामाचे दर्शन घेतले. समर्थ रामदासांनी महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी सर्वप्रथम देशाचे भ्रमण केले आणि या समाजाच्या तारणासाठी राम हेच दैवत असून, राम नाम हेच शब्द देशाला आणि समाजाला तारू शकते, हे सांगितले. जो स्वत:मध्ये रमतो तो राम. या रामाचे नाव घ्यायला हवे. जोपर्यंत राम पूर्णपणे ध्यानात येत नाही, मनात बसत नाही तोपर्यंत रामनामाचा जाप करत राहावा. जीवाला विसावा मिळेपर्यंत रामनाम जप करीत राहावे. जोपर्यंत आत्म्याचे परमार्थ्यांशी तादातम्य होत नाही तो पर्यंत राम जपावा. कीर्तन महोत्सवातील ही सून (मानसी बडवे) आणि सासरे (मिलिंद बडवे) यांची जुगलबंदी श्रोत्यांसाठी मनमोहक घडली.




पत्ता- ए-१/७, निशिगंध, दामोदर विहार, हिंगणे खुर्द, सिंहगड रोड, पुणे- ५१
दुरध्वनी- २०२-२४३५८२३३
मोबा- ९८८१२१०४६५

1 comment:

  1. मानसी बडवे यांचे १९८६ हे जन्मसाल चुकीचे वाटते. २००५ साली (म्हणजे वयाच्या १९व्या वर्षी?) त्यांना बालगंधर्व पुरस्कार मिळाला? त्यांची ऑगस्ट २०१२पर्यंत ११०० कीर्तने झाली? खरे वाटत नाही; जन्मसाल देण्यात काही गलती झाली असल्यास सुधारावी.-मल्लीनाथ

    ReplyDelete