Total Pageviews

Sunday, September 9, 2012

मृणालिनी चिंतामणी चितळे





जन्म- १५.८.१९५७.

कलाक्षेत्र- लेखन.

गुरु- महर्षी व्यास, रविंद्रनाथ टागोर, शेक्सपिअर यांची प्रतिभा..हे सारे गुरुस्थानी.


विशेष पुरस्कार- ह्दयस्थ या शब्दांकित केलेल्या पुस्तकास वा. रा. पुरस्कार. वळण या बालकथेस अ.भा. बालकुमार साहित्य पुरस्कार. बायपासला पर्य़ाय-महाराष्ट्र राज्य पुरस्कार. पुणेमनापातर्फे सामाजिक कामासाठी गौरव पदक देउन सन्मान.


विशेष माहिती- स्त्री मासिकात सहा वर्षे कार्यकारी संपादक म्हणून काम. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या संचालक पदावर नियुक्ती.


पत्ता- गोपिकाश्रम, ७५९/३२, डेक्क्न जिमखाना, पुणे-४.
दुरध्वनी- ०२०- २५६७६६६१.
बा- ९८२२३०१७५०
Email- mrinalini_chitale@yahoo.com





मृणालिनी चितळे यांच्या कथांत आधुनिक मध्यमवर्गीय जीवनातील स्पंदनं उमटलेली आहेत. शाळेत शिकणा-या मुलीपासून ते वृद्धाश्रमात राहणा-या वृद्धेपर्यंतच्या सर्व वयांतील व्यक्ती या कथासृष्टीत वावरतात. तीत माणसामाणसातला संघर्ष आहे. जिव्हाळाही आहे. अबोल ताण आहे. मन:पूर्वक प्रेमही आहे. मित्रमैत्रिणींच्या संवादात स्वत:च्या प्रश्नांना उत्तरं शोधणारी माणसं आहेत. हिमालयाच्या सहवासात स्वत:चं दु:ख विसरू शकणारी माणसंही आहेत. त्यांच्या सुखदु:खांचं मूळ बदलत्या आधुनिक जीवनाच्या आशाआकांक्षांमध्ये आहे. म्हणून या आजच्या काळाचा स्वर खेचून घेणा-या कथा आहेत.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार:
‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चा शरच्चंद्र चिरमुले पुरस्कार (2012)




No comments:

Post a Comment