दूरध्वनी- २०२-२५२८२२८०
मोबा- ९८२३९८९२३९
कलाक्षेत्र- संगीताताली सर्व प्रकारेचे गायन
गुरू- वडील, केंडे बुवा, बुर्ली. राम कदम, गजाननराव वाटवे, खाडीलकर.
विशेष पुरस्कार- नाट्यसंगीतात नाशिक, पुणे, नागपूर इथे प्रथम पारितोषिक .
विशेष माहिती- सुगम संगीत, अभंग, भावगीते, भक्तिगीते नाट्यगीते, गीतरामायण, मंगलाष्टके या सर्व प्रकारांचे सुयोग्य व समर्थ गायनाचे अनेक कार्यक्रम महाराष्ट्रात चालू आहेत.
आकाशवाणी आणि दूरदर्शवरही सादरीकरण.
जयश्री कुलकर्णी
ह्या ’ग्वालिय्रर’ घराण्याच्या गायिका. वडील आणि आजोबा हे दोघेही संगीत
नाटकांमध्ये काम करायचे. संगीताचे वातावरण त्यांच्या कार्किदीला पोषक
ठरले. प्रथम केंडेबुवा आणि नंतर व्यंकटेश बुर्ली यांच्याकडे त्यांनी
शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले.
बार्शीच्याच एका गणेशोत्सवात त्यांची मैफ़ल एवढ़ी गाजली की सलग तेरा दिवस त्यांचे वेगवेगळ्या गावी प्रयोग झाले आणि अल्पावधीतच त्या लोकप्रिय गायिका बनल्या. १९८६ साली त्यांची संगीतकार राम कदम यांच्या बरोबर ओळ्ख झाली. आवाजातील गोडवा आणि नजाकत ओळखुन त्यांनी ’सुर ताल’ कार्यक्रमामधे संधी दिली. ’मुर्तिमंत भगवंत भेटला शाम’ हे गाणे खूपच लोकप्रिय ठरले. राम कदम यांच्यामुळे ’लावण्यवती’, ’साईबाबा’, ’झेड.पी’, ’जन्मठेप’ आदी चित्रपटात गायनाची संधी मिळाली. दूरचित्रवाणीवरील काही मालिकांसाठी ही त्यांनी पार्शवगायन केले आहे. त्यातील एक म्हणजे लोकप्रिय मालिका ’सांजवात’. |
पुण्यातील
अनॆक नामवंत कार्यक्रमांमधून त्या आपली कला सादर करतात. ’स्वराली’, ’रसिका
तुझ्याचसाठी’, ’संत दर्शन’,’आनंद गाणी’, ’गंध फ़ुलांचा’ हे त्यातील काही.
त्यांनी स्वत: स्थापन केलेल्या ’स्वरसौरभ’ या कार्यक्रमाचे पण ५०० हून
अधिक प्रयोग झाले आहेत.
झी.टीव्ही वरील ’सूर ताल’, ’देवाचिये द्वारी’, ई. टीव्ही वरील ’गीत रामायण’,’सगुण निर्गुण’ व ’जीवनगाणे’, दूरदर्शन वरील ’शब्दांच्या पलिकडले’ वरील या कार्यक्रमातून त्या सर्वपरिचीत आहेतच. पुणे फ़ेस्टिव्हल मध्ये सादर ’तुका आकाशा ऎवढ़ा’ कार्यक्रमही चांगलाच गाजला. जयश्री कुलकर्णी यांची खासियत की त्या भावगीत, अभंग, नाट्यगीत, लावणी आणि शास्त्रीय संगीत तेवढयाच ताकदीने पेश करतात. नुकताच त्यांना ’स्व. राम कदम पुरस्कार’ ने मिरज येथे सन्मानित करण्यात आले. त्याच्या आवाजातील ’पंढ़रीचा देव बहुत कोवळा’ ह्या सी. डी. प्रकाशन प्र. गायक श्री. अरुण दाते यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. सी.डीज बाजारात लवकरच उपलब्ध होतील. |
No comments:
Post a Comment