Total Pageviews

Tuesday, October 2, 2012

राजेंद्र कृष्णाजी राऊत




जन्म- २७.५.१९६३

कलाक्षेत्र- चित्रकार, शिल्पकार, शाहिर, फोटोग्राफी.

विशेष पुरस्कार-  शिवाजी विद्यापीठ लोककला उत्सवात पुरस्कार. महाराष्ट्र शाहिर परिषदेचा युवा शाहिर पुरस्कार. शाहिर भाऊ फक्कड पुरस्कार,सातारा. शिवशंभू प्रतिष्ठान शिवशाहिर महाराष्ट्र भूषण पुरस्कार,पुणे. सुभाषचंद्र बोस पुरस्काराने सन्मानित.

विशेष माहिती- `रायगडीचा शिवछत्रपती` या प्रदिर्घ पोवाड्याची निर्मिती. क्रांतीवीर छ.चित्रासाहेब महाराज, १८५७ चे स्वतंत्र्य युध्दाचा एकमेव पोवाडा, श्री करवीर महालक्ष्मी गोरवगीत, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचलनालयाचे मानद प्रशिक्षक.



पत्ता- शिवछाया, १२४७ ए, संध्यामठ गल्ली, शिवाजी पेठ, कोल्हापूर.
दुरध्वनी- २६२३६५०
मोबा- ९८९०३१२८१४




धर्म, अर्थ, न्याय व चारित्र्याची जपणूक करत देव, देश व धर्माची राखण करत राज्य केले म्हणूनच शिवरायांची कीर्ती आजही अजरामर आहे, असे कोल्हापूर येथील शिवशाहीर पुरुषोत्तम ऊर्फ राजेंद्र कृष्णाजी राऊत यांनी सांगितले.
श्री सेवागिरी व्याख्यानमालेत शाहीर राऊत यांनी "रायगडीचा शिवछत्रपती' या विषयावर पोवाडे सादर केले.

"छत्रपतींच्या राजधानीचा मान तुला रे रायगडा! कैसा होता शिवबा राजा, बोल बोल तू घडा घडा!' असा प्रश्‍न विचारल्यावर शिवरायांच्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा साक्षीदार असलेला रायगड किल्ला शाहिरांशी काय बोलला हे त्यांनी पोवाड्यातून स्पष्ट केले.

शिवरायांना मावळ्यांनी दिलेल्या निष्ठा आज कोणत्याही राजकीय व्यक्तीला मिळत नाही. शिवरायांचा एकेक मावळा म्हणजे एकेक प्रबळ गड किल्लाच होता. जिवावर तुळशीपत्र ठेवून स्वराज्याच्या बांधणीसाठी लढणारे असे त्यांचे साडेतीन लाख गडकिल्ले होते. म्हणूनच या सवंगड्यांवर शिवरायांचे जिवापाड प्रेम होते.

रायगडावर महाराजांनी अनेक भव्य वास्तू बांधल्या; पण या वास्तूंच्या पडझडीमुळे आता हे वैभव लुप्त होत चालल्याची खंत हा रायगड व्यक्त करत आहे.

ज्येष्ठ त्रयोदशीला पावसाळ्यात रायगडावरून वाहणारे पाण्याचे धबधबे पाहताना आपणास मनोहर वाटते; पण शिवरायांच्या आठवणीने घायाळ झालेला हा रायगड धबधब्यांच्या माध्यमातून जणू अश्रूच ढाळतो आहे, अशी कल्पना या शाहिराने मांडली.

शिवरायांच्या स्वच्छ चारित्र्यामुळे व उच्च व्यक्तिमत्त्वामुळे शिवाजी महाराज या नावाची जादू आजही टिकून आहे.





No comments:

Post a Comment