Total Pageviews
Monday, January 23, 2012
सुधाकर कदम
गझल गंधर्व सुधाकर कदम
जन्म १३ नोव्हेंबर, १९४९
पत्ता- सी-१-सी/१३,गिरीधर नगर,वारजे-माळवाडी,पुणे-५८.
मोबा.९८२२४००५०९
email-kadamsudhakar59@gmail.com
कलाप्रकार- गझल गायक
आद्य मराठी गझल गायक म्हणून सुरेश भट आणि संगीतकार यशवंत देव यांनी गौरविले.ज्या वेळी महाराष्ट्रात मराठी गझल गायनाचा कार्यक्रम कोणीच करीत नव्ह्ते तेव्हा गझल गायनाचा तीन तासाचा कार्यक्रम करीत होतो.महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर शेकडो वैयक्तिक कार्यक्रम केलेत.
१९८० ते १९८३ या या काळात सुरेश भट आणि मी,मराठी गझल गायकी लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून "अशी गावी मराठी गझल"हा कार्यक्रम करीत पदराला खार लावीत एस.टी.ने तर कधी रेल्वेने अक्षरशः महाराष्ट्रभर वणवणलो.या कार्यक्रमाचे निवेदन बहुतेक सुरेश भट करायचे तर कधी कधी डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी करायचे.
(आमच्या या मेहनतीचे फळ सध्याचे गायक चाखत आहेत.)
१९८३ मध्ये"भरारी"नामक मराठी गझल गायनाची पहिली वहिली ध्वनिफ़ित तयार केली. मराठी गझल गायकीतील भरीव कामगिरीबद्दल स्वतः सुरेश भटांनी १९८१ मध्ये "महाराष्ट्राचे मराठी मेहदी हसन " म्हणून गौरविले.
तसेच "गझलनवाज" (१९८२),"Outstanding Young Person"(१९८३),"समाजगौरव"(१९९५),"संगीत भूषण"(१९९६), "Man Of TheYear2001"(यु.एस.ए.),"कलादूत"(२००२),"कलावंत"(२००३), "शान-ए-गज़ल"(२००५),"महाकवी संतश्री विष्णुदास पुरस्कार"(२००६)"गझल गंगेच्या तटावर..."(२००८),"सुरेश भट पुरस्कार" आणि,"गझल गंधर्व" उपाधी(२००९) वगैरे सन्मान मिळाले.
अनेक म्युझिक अल्बमचे संगीत दिग्दर्शन केले असून नुकताच ’काट्यांची मखमल...’ नावाचा मराठी गझलांचा अल्बम युनिव्हर्सल म्युझिक कंपनीतर्फे बाजारात आला आहे.
दिलीप पांढरपट्टे यांच्या गझला सुरेश वाडकर आणि महागायिका वैशाली माडे यांनी गायिल्या असून,संगीत दिग्दर्शन
माझे आहे.
सध्या नवोदित गायकांना मराठी गझल गायकीचे शिक्षण देत आहे.तसेच गझलकार,गायक,वादक यांनी दर महिन्याला एकत्र येण्याकरीता "गझलकट्टा" आयोजित करीत आहे.
(ही माहिती स्वतः सुधाकर कदम यांनी दिली आहे.)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment