Total Pageviews

Monday, April 13, 2015

हृषीकेश बोडस यांच्या गायनाची रंगतदार मैफल

पुणेकरांची दादही उत्तम-नाट्यपदांना अधिक दाद


पुन्हा एकदा या नटाने मराठी संगीत नाटके करावीत..त्याच्या पदांबरोबरच त्याच्या आभिनयाला लोक दाद देतील ...मात्र दुर्दैव इतकेच तो मिरजेत रहातो...पुण्या-मुंबईत नाही..काल त्याच्या मैफलीतली नाट्यपदे अनुभवली आणि पुन्हा ते पंचवीस वर्षापूर्वीचे दिवस आठवले..जेव्हा तो सांगलीच्या संस्थेच्या वतीने सौभद्र नाटक घेऊन राज्य नाट्य संगीत नाट्यस्पर्धेत आपली भूमिका सादर करीत होता...सुभद्रा होती वर्षी खाडीलकर..अर्थात आजची सौ. वर्षा भावे... रविवारी संध्याकाळी ज्याची मैफली ऐकली तो कलावंत होता..
हृषीकेश बोडस...आणि स्थान होते..पुण्यातले बेडेकर गणपती मंदीराचे सभागृह...


सांगली गायक  पं. अरविंद पटवर्धन यांच्या तीस-या स्मृतीदिनाचे औचित्य साधून त्यांच्या कुटुंबीयांनी
हृषीकेश  बोडस यांना पुण्यात गाण्यासाठी निमंत्रित केले होते..
आपण कुणी पंडीत नाही..प्रामाणिकपणे ही पटवर्धन यांना वाहिलेली सुमनांजली आहे...असे नम्रपणे सांगत त्यांना आपल्या गायनाची सुरवात शास्त्रीय संगीताच्या रागाने केली..त्याचा विस्तार करताना त्याची बैठक किती भक्कम पायावर उभी आहे याची जाणीव त्याच्या स्वरमेळाच्या फिरकतीतून होत होती..त्याची लय आणि सूरांची रंगत वाढत जाऊन द्रुत बंदीश आणि तराण्यात त्याची स्वरातली किमया जादुभरी मनाने रसिक पहात होते..आणि दादही देत होते...

मात्र देहाता शरणागता..या पदापासून त्याने जी नाट्यपदांची रंगतदार मालिका सादर केली..त्यातली भूमिकाच बाहेर येते  स्वरातून आणि त्या शब्दामधून

 गेल्या चाळीस वर्षातील रियाजातून त्याचे परिपक्व होणे बाहेर येत होते..
बहुत दिननच भेटलो सुंदरीला..नंतर चाॅंद माझा हा हसरा..ह्या दोनही पदांमधला स्वरराज छोटा गंधर्व गायकीचा खास लडीवाळपण खेळवत अनेकविध भावभावनांचे सुरेल विश्वच त्याच्या गायकीतून रसिकांच्या मनात चालू होते..

शतजन्म शोधिताना मधली..क्षण एक क्षणात गेलाची नाट्यात्मक गंमत किती वेगळ्या त-हेने त्याने आळविलेी  ते ऐकणे मोठे मजेशीर होते...

तुजविण एकली रे् कृष्णा ही गवळण..आणि शेवटच्या भैरवीतला अभंग  यातून हे स्वरांचे सतत दोन तास चाललेले आवर्तन थांबले...













मात्र मनात त्या स्वरांची दुनिया गुणगुणत सारे रसिक घरोघरी पांगले गेले..

प्रसाद जोशी यांच्या तबल्यातील लयदार ठेका

आणि श्रीराम हसबनीस यांची जादुमयी स्वरझलक हार्मोनियमच्या बंदिस्त चौकटीत अशी काही करामत

करत होती..की दोन्ही संगतकारांना मनापासून दाद मिळत होती..
आज वयाची साठी उलटून गेली तरीही वसंत फुलतो..तसाच त्यांचा आवाज..देखणे रुप आणि शब्दातली स्वरांची बहर सारच तसेच आहे..


अशा पुण्याबाहेर मेहनती कलावंताची दखल संगीत रसिकांनी घ्यावी यासाठी आयोजकांनी अशा बाहेरील कलावंताला संधी द्यायला हवी..


- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments:

Post a Comment