आपले आदरणीय गुरू बेंगलुरूचे पं.विनायक तोरवी यांची सायंकालीन रागांची मैफल काल म्हणजे शनिवारी पुण्यातल्या गरवारे सभागृहाच्या रंगमंचावर किशोर देसाई यांनी सादर करुन आपल्या म्हणजे किशोर पंप्स या व्यावसायिक संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाची सुरवात अभिजित अशा भारतीय शास्त्रीय संगीताच्या या मैफलीने केली.
व्यवसाय सांभाळून स्वतः किशोर देसाई शास्त्रीय संगीताची आराधना करतात..स्वतः उत्तम गातात..यापेक्षाही इतरांचे गाणे मनापासून ऐकतात..इतरांना ते ऐकवतात..
भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या मांडणीचे गमक विनायक तोरवी यांच्या गळ्यात सहजी आले आहे..त्यांच्या मैफलीत ते उत्तम स्वरांची आराधना करतात..उतरांना स्वरांचा आनंद देतात..काल सुश्रूत आणि संस्कार भारती यां दोन संस्थांच्या सहकार्याने मैफलीत जान आली..
आरंभी पुरवी..रागातली एक रचना सादर केली..त्यातली स्वरांचे ठहराव,लगाव आणि स्वरांची कसरत आनंद देणारी होती..त्यानंतर सादर केली ती तिलक कामोद रागातली रचना...एक कबीराची रचना गाभन मग एक मराठी अभंगाने त्यांनी आपल्या कसदार गायनाची समाप्ती केली.
उत्तरोत्तर रंगत गेलेली ही मैफल ऐकण्यासाठी पं. विजय कोपरकर, आनंद भाटे, अरविंद थत्ते, हेमेत पेंडसे, सुहास व्यास,जयराम पोतदार,असे कित्येक कलावंत दाद देण्यासाठी हजर होते.
तबला साथ निखिल फाटक यांनी तेवढ्याच तल्लीनतेने करून मैफलीचे ताल सांभाळले..तर स्वरांची साथ हार्मोनियमवर केली ती राहूल गोळे या तरबेज वादकाने..
यानिमित्त सुश्रूत संस्थेला वीसहजाराची देणगी १२ विद्यार्थ्यांना मोफत ऐकता यावे यासाठी किशोर देसाई यांनी पं. विजय कोपरकर यांच्या हाती सूपूर्द केली..
पं. विनायक तोरवी यांनी ही मैफल आपल्या अभ्यासू आणि तेजस्वी गायनाने रसिकांच्या मनात साठवून ठेवली..
- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
-9552596276
No comments:
Post a Comment