Total Pageviews

Tuesday, February 4, 2014

मुकुंदराज देव - फ्युजन अल्बम प्रकाशित!

'RHYTHM FANTASY'

तालमणी मुकुंदराज देव आजच्या युवा पिढीतील एक प्रतिथयश व प्रतिभावंत तबलावादक. आपलं अभिजात शास्त्रीय संगीत, अतिशय समृद्ध वारसा लाभलेलं आहे, तसंच ते अथांग आहे. प्रत्येक सृजनशील कलावंत ह्या संगीत सागरातून त्याच्या कल्पनेतील मोती शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. 'RHYTHM FANTASY' मुकुंदराज देव यांचा नवीन फ्युजन अल्बम गडकरी रंगायतन, ठाणे येथील युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपच्या वतीने प्रकाशित करण्यात आला. या प्रकाशन सोहळ्यास तालमणी मुकुंदराज देव, विश्वविख्यात गायिका संगीत सम्रानी बेगम परवीन सुलताना, संगीत मार्तंड उ. दिलशाद खान, योगाचार्य श्रीकृष्ण अण्णा व्यवहारे, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे राजन प्रभू, श्रीराम देव, मंजिरी देव, सतीश व्यास, सतीश वर्धे, मनाली देव, अनंत केमकर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक प्रकाशित करण्यात आला.               

गेल्या दोन शतकांहून अधिक काळ संगीत - साधना करणाऱ्या तालमणी मुकुंदराज देव ह्यांना त्यांच्या ह्या सांगितिक कारकिर्दीत अनेक दिग्गज बुजुर्ग कलावंतांचा सहवास लाभला. हि अनुभवाची शिदोरी, त्याला लाभलेली सृजनशीलतेची जोड अन साधना करता - करता स्वत:ला साक्षात्कार झालेली तालाची, सुराची विविध रूपे साकार झाली आहेत - 'RHYTHM FANTASY' या त्यांच्या नव्या कोऱ्या अल्बममध्ये. 

नादाची विविध रूपे, फ्युजन, लयाकारीची जादू, आजकालच्या तरुणपिढीला मोहित करेल असे धुंद मस्तिभरे संगीत, तसेच नृत्याविष्कारासाठी उपयोगी धून… थोडक्यात एक परिपूर्ण अशी सीडी जी युनिव्हर्सल म्युझिक कंपनी सारखी नामांकित म्युझिक कंपनीने प्रकाशित केली आहे. 'चेस एंड हंट', '७ इन द मिस्ट', स्पाईस ऑफ लखनौ' अशा सात वेगवेगळ्या संकल्पना, त्यावर आधारित बेधुंद करायला लावतील अशा रचना, नाद- भाव  यांची तबल्याच्या माध्यमातून गुंफलेली सुंदर माळ, म्हणजेच 'RHYTHM FANTASY'. सर्व प्रकारच्या संगीत प्रेमींना आणि विशेषकरून तरुणांना आनंद देईल अशी हि सीडी आहे.   

No comments:

Post a Comment