Total Pageviews

Wednesday, October 10, 2012

मंजिरी प्रवीण जोशी





कलाक्षेत्र- गायिका, निवेदिका.

विशेष मिहिती

संगीत क्षेत्रात गेली २७ वर्षं कार्यरत. गजाननराव वाटवे यांच्यापासून ते आत्ताच्या लिटिल चॅम्प्स पर्यंत अनेक कलाकारांच्या मैफलीमध्ये निवेदिका म्हणून कार्यरत.
`तुझ्या माझ्यात` या मराठी चित्रपटातील गाण्याचे गीत लेखन.
`रुणझुणत्या पाखरा` या कार्यक्रमाची निर्मिती.
`इवली इवली चांदणी` या अल्बमचे गीत लेखन व संगीत दिग्दर्शन.
स्वतःच्या `मधुरंजनी` या संस्थेमार्फत संगीताचे शिक्षण.




पत्ता- 
६२४/१/ब, श्रीनंद , बकुळनगर, बिबवेवाडी, पुणे-३७.
दुरध्वनी- ०२०- २४४१०४२८
मोबा- ९४२२३२३४८४.




Friday, October 5, 2012

श्रुति विजय कोपरकर






जन्म- २४ जून १९९०

कलाक्षेत्र- संगीत-गायन.

गुरू- सौ. विदुला जोशी, पं. विजय कोपरकर.

विशेष पुरस्कार- अनेक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धत सहभाग व  पारितोषिके. राज्यस्तरीय स्पर्धामंध्ये सहभाग आणि बक्षिसे प्राप्त.

विशेष महिती- टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आयुर्वेद योगशिक्षक अभ्यासक्रम प्रथम क्रमांक. मास्टर ईन क्लिनीकल सायकॉलॉजी. संगीत विशारद.





पत्ता-१/३, धायरी गाव, काळभैरव मंदिराजवळ, पुणे- ४१.
दूरध्वनी- ०२०-२४६९०४४९
मोबा- ९९२२०१४६७०


Tuesday, October 2, 2012

कार्तिकी गायकवाड





जन्म- १९९७.

कलाक्षेत्र- गायिका.

गुरू- वडील पं. कल्याणजी गायकवाड.


 

विशेष पुरस्कार- महाराष्ट्र शासन व पिंपरी-चिंचवड म.न.पा. पुरस्कार..कुसुमताई चव्हाण पुरस्कार-नांदेड, महाराणी ताराराणी पुरस्कार-पुणे, मराठवाडा विशेष पुरस्कार-मुंबई.

विशेष माहिती- झी मराठी सारेगमप लिटिल चॅम्प्स महाविजेती. चित्रपट पार्श्वगायिका, संगीत विशारद.





पत्ता- कृष्णाई संगीत शिक्षण संस्था, आळंदी देवाची, पुणे-५.
भ्रमणध्वनी- ९८२२४११४६०






आयडीया सारेगमप च्या पहिल्या लिटील चॅम्प सिझनची विजयी गायिका ‘कार्तिकी गायकवाड’ आता ‘यमाच्या गावाला जाऊ’ या संकेत वाकुडकर दिग्दर्शित चित्रपटात एका छोट्या भूमिकेत दिसणार. 

 एकदा स्वर्गात अशी वेळ येते, ज्यात खुद्द यमाचीच मदत घ्यावी लागते. त्यानंतर यमामुळे भूतलावर घडणार्‍या गमतीशीर गोष्टी या विषयावर ज्ञानेश वाकुडकर यांनी या चित्रपटाची कथा लिहीली आहे. यात कार्तिकीने एक गाणं स्वत: म्हटलं आहे आणि तेच गाणं तिच्यावर चित्रीत केलं आहे. प्रेरणादायी आणि जीवनात सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा संदेश देणार्‍या या गाण्याचा भावार्थ मनाला स्पर्शणारा आहे.

डॉ. सौ.भारती वैशंपायन





कलाक्षेत्र- संगीत- (मास्टर ऑफ आर्ट एस.एन.डी.टी.,मुंबई)

विशेष पुरस्कार- नॅशनल स्कॉलरशिप भारत सरकार १९७७, गान-हिरा एस.एन.डी.टी.मुंबई १९८२, आदर्श शिक्षक पुरस्कार शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. संगीतकार राम कदम पुरस्कार,पुणे. कोल्हापूर भूषण पुरस्कार. भारत ज्योती इंटरनॅशनल फ्रेंडशिप सासायटी.

विशेष माहिती- १९९१ पासून शाही संगीत महात्सवाचे आयोजन. ऑक्टोबर २००१ पासुन घराणा संमंलनाचे आयोजन. १९८४ पासून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथे संगीत विभाग प्रमुख म्हणून कार्यरत.


 


पत्ता- १७३१/२२, नीलांबरी, न्यू महाद्वार रोड, कोल्हापूर-१.
दुरध्वनी- २६२१०५९

राजेंद्र कृष्णाजी राऊत




जन्म- २७.५.१९६३

कलाक्षेत्र- चित्रकार, शिल्पकार, शाहिर, फोटोग्राफी.

विशेष पुरस्कार-  शिवाजी विद्यापीठ लोककला उत्सवात पुरस्कार. महाराष्ट्र शाहिर परिषदेचा युवा शाहिर पुरस्कार. शाहिर भाऊ फक्कड पुरस्कार,सातारा. शिवशंभू प्रतिष्ठान शिवशाहिर महाराष्ट्र भूषण पुरस्कार,पुणे. सुभाषचंद्र बोस पुरस्काराने सन्मानित.

विशेष माहिती- `रायगडीचा शिवछत्रपती` या प्रदिर्घ पोवाड्याची निर्मिती. क्रांतीवीर छ.चित्रासाहेब महाराज, १८५७ चे स्वतंत्र्य युध्दाचा एकमेव पोवाडा, श्री करवीर महालक्ष्मी गोरवगीत, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचलनालयाचे मानद प्रशिक्षक.



पत्ता- शिवछाया, १२४७ ए, संध्यामठ गल्ली, शिवाजी पेठ, कोल्हापूर.
दुरध्वनी- २६२३६५०
मोबा- ९८९०३१२८१४




धर्म, अर्थ, न्याय व चारित्र्याची जपणूक करत देव, देश व धर्माची राखण करत राज्य केले म्हणूनच शिवरायांची कीर्ती आजही अजरामर आहे, असे कोल्हापूर येथील शिवशाहीर पुरुषोत्तम ऊर्फ राजेंद्र कृष्णाजी राऊत यांनी सांगितले.
श्री सेवागिरी व्याख्यानमालेत शाहीर राऊत यांनी "रायगडीचा शिवछत्रपती' या विषयावर पोवाडे सादर केले.

"छत्रपतींच्या राजधानीचा मान तुला रे रायगडा! कैसा होता शिवबा राजा, बोल बोल तू घडा घडा!' असा प्रश्‍न विचारल्यावर शिवरायांच्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा साक्षीदार असलेला रायगड किल्ला शाहिरांशी काय बोलला हे त्यांनी पोवाड्यातून स्पष्ट केले.

शिवरायांना मावळ्यांनी दिलेल्या निष्ठा आज कोणत्याही राजकीय व्यक्तीला मिळत नाही. शिवरायांचा एकेक मावळा म्हणजे एकेक प्रबळ गड किल्लाच होता. जिवावर तुळशीपत्र ठेवून स्वराज्याच्या बांधणीसाठी लढणारे असे त्यांचे साडेतीन लाख गडकिल्ले होते. म्हणूनच या सवंगड्यांवर शिवरायांचे जिवापाड प्रेम होते.

रायगडावर महाराजांनी अनेक भव्य वास्तू बांधल्या; पण या वास्तूंच्या पडझडीमुळे आता हे वैभव लुप्त होत चालल्याची खंत हा रायगड व्यक्त करत आहे.

ज्येष्ठ त्रयोदशीला पावसाळ्यात रायगडावरून वाहणारे पाण्याचे धबधबे पाहताना आपणास मनोहर वाटते; पण शिवरायांच्या आठवणीने घायाळ झालेला हा रायगड धबधब्यांच्या माध्यमातून जणू अश्रूच ढाळतो आहे, अशी कल्पना या शाहिराने मांडली.

शिवरायांच्या स्वच्छ चारित्र्यामुळे व उच्च व्यक्तिमत्त्वामुळे शिवाजी महाराज या नावाची जादू आजही टिकून आहे.